top of page

यशस्वी कीर्तनकार बना... यशस्वी प्रवचनकार बना...

कीर्तनविश्व आयोजित

कीर्तन प्रवचन अभ्यासवर्ग - २०२३

KirtanVishwa Logo.png
कीर्तनविश्व
BHISHMA Logo.jpg
भीष्म इंडिक फाउंडेशन 
विश्व मराठी परिषद.jpg
विश्व मराठी परिषद

चार महिन्यांचा ऑनलाईन अभ्यासक्रम (तिसरी बॅच)

२२ एप्रिल ते १८ ऑगस्ट २०२३ 

सोमवार ते शुक्रवार | रोज ९० मिनिटे | सकाळी ०८.०० ते ०९.३० | Zoom द्वारे

प्रमुख मार्गदर्शक: आंतरराष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. चारुदत्तबुवा आफळे 

४०० हून अधिक वर्षांची कीर्तन परंपरा, कै. गोविंदस्वामी आफळेबुवा यांचा वारसा समर्थपणे चालवणारे सुपुत्र

एक उत्तम करियर संधी  

महिला-पुरुष सर्वांना प्रवेश | वयोमर्यादा - १५ च्या पुढे

Zoom Live वर्ग + ​​उजळणीसाठी सर्व अभ्यासवर्गांचे रेकॉर्डिंग उपलब्ध करून दिले जाणार आहे

Kirtan Pravachan Abhyaskram
  • विविध कीर्तनपरंपरांचा परिचय 

  • भविष्यात डिजिटल माध्यमांमध्ये मोठी संधी ! 

  • करियर विषयक मार्गदर्शन आणि सहाय्य

  • जीवनाच्या... करियरच्या सर्व स्तरांवर उपयुक्त ठरणारा अभ्यासक्रम

  • सध्याच्या करियर सोबत समांतर करियर विकसित करायची संधी

brochure

Thanks for Interest!

Get brochure on WhatsApp.

Click here and send a WhatsApp message and save our number (7843083706)

या अभ्यासक्रमाची संपूर्ण माहिती (Brochure) व्हॉट्सअ‍ॅपवर मागवण्यासाठी 7843083706 या क्रमांकावर Kirtan Abhyaskram असा मेसेज पाठवा.

Ancient Background.jpg

कीर्तन आणि प्रवचन ही एक प्राचीन सांस्कृतिक कला आहे. पूर्वीच्या काळी जेव्हा रेडिओ, दूरदर्शन, इंटरनेट नव्हते तेव्हा कीर्तनकार, प्रवचनकार, व्याख्याते हेच सामाजिक आणि सांस्कृतिक अभिसरणाची माध्यमे होती. त्यांच्याद्वारेच समाजाचे मानसिक, भावनिक, नैतिक आणि अध्यात्मिक पोषण होत होते. समाजव्यवस्थेचा रहाटगाडगा व्यवस्थित चालवण्यासाठी आणि समाजाचे नैतिक अधिष्ठान टिकवण्यासाठी कीर्तनकारांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. आता पुन्हा एकदा कीर्तनकारांना, प्रवचनकारांना चांगले दिवस येत आहेत. त्याला कारण आहे तंत्रज्ञान ! तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपली संस्कृती आणि परंपरा जगभर पोहोचवण्याची संधी कीर्तनकारांना आणि प्रवचनकारांना उपलब्ध झालेली आहे.

​​विविध कीर्तन परंपरांचा परिचय 

१) नारदीय कीर्तन

२) राष्ट्रीय कीर्तन

३) वारकरी कीर्तन

४) रामदासी कीर्तन

५) दासगणू महाराज कीर्तन 

६) विज्ञान कीर्तन

७) राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कीर्तन

८) गाडगेबाबा कीर्तन

९) सामाजिक कीर्तन 

१०) सांस्कृतिक कीर्तन 

अभ्यासक्रम रचना

  • प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन - LIVE ऑनलाईन 

  • (सोम ते शुक्र) रोज एक तास मार्गदर्शन + अर्धा तास प्रश्नोत्तरे

  • मूल्यमापन व परीक्षा : गृहपाठ, तोंडी परीक्षा, लेखी परीक्षा, प्रत्यक्ष सादरीकरण

  • ​दोन दिवसीय प्रत्यक्ष मार्गदर्शनाची दोन सत्रे  - पुणे येथे 

  • उजळणीसाठी सर्व सत्राचे रेकॉर्डिंग मिळणार

  • स्टडी मटेरिअल - हार्ड कॉपी + ईबुक 

  • प्रत्येकाला प्रमाणपत्र | मर्यादित जागा

  • आंतरराष्ट्रीय ऍक्रिडिएशन प्राप्त अभ्यासक्रम 

या अभ्यासक्रमात आपण काय शिकाल ?

  • कीर्तन परंपरेचा इतिहास आणि अखिल भारतातील कीर्तन परंपरांचा परिचय.

  • चार महिन्यात जवळ जवळ २० संतचरित्रांचा परिचय अधिक त्याविषयी प्रवचनाचे तंत्र

  • ​वीस संतांचा वाङमयीन परिचय.

  • प्रमुख पाच कीर्तन पद्धतींचे मांडणी तंत्र.

  • पूर्वरंग - उत्तररंग सहित कीर्तनप्रक्रियेतील सर्व महत्वाचे टप्पे. 

  • कीर्तनाला आवश्यक ती कंठ संगीतात्मक माहिती.

  • टाळ, मृदंग, वीणा, तबला, पेटी या वाद्यांची ओळख.

  • प्रवचनांसाठी अभ्यासग्रंथांचे मार्गदर्शन.

  • वकृत्व कला, संभाषण कला, सादरीकरण व देहबोली, संवाद कौशल्य, कथाकथन कला यांची रहस्ये.

  • कीर्तनाचे अनुशंगाने संस्कृत मराठी श्लोक, सुभाषिते व प्रमाणाधर अशी ओव्या अभंगांची शिदोरी.

main-qimg-0d1aef6033d8afa29c9a5f92ea96a422.jpg

अगोदरच्या बॅच मधील विद्यार्थ्यांचे कीर्तन सादरीकरण