top of page

कीर्तने महादोष जाती । कीर्तने होये उत्तम गती । कीर्तने भगवत प्राप्ती । यदर्थी संदेह नाही ।।

कीर्तने वाचा पवित्र । कीर्तने होये सत्पात्र । हरिकीर्तने प्राणीमात्र । सुसिळ होती ।।

Front.jpg
Vyas.png
Naradmuni.png
vmp.png

भीष्म फाऊंडेशन फॉर भारतीय नॉलेज सिस्टीम्स आणि विश्व मराठी परिषदेचा संयुक्त उपक्रम 

ज्याला... जेंव्हा... जेथे... जे कीर्तन ऐकायचे ते कीर्तन ऐका... कीर्तनविश्व या युटयूब चॅनेलवर 

तिसऱ्या वर्षाचा प्रारंभ.. गुढी पाडवा, चैत्र शुद्ध प्रतिपदा, २२ मार्च २०२३ 

 १ लाखाहून अधिक स्बस्क्राईबर्स । ७५ लाख हून अधिक व्ह्युज

Bhishma.png
KirtanVishwa YT Channel.png

संकल्पना 

DSCN6341_edited.jpg

प्रा. क्षितिज पाटुकले

संस्थापक - कीर्तनविश्व 

आशिर्वाद 

SGSD_edited.jpg

प. पू. स्वामी गोविंददेव गिरी

कोषाध्यक्ष - श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र 

​प्रमुख मार्गदर्शक 

800px-Vijay_Bhatkar_Portrait_Photo_edited.jpg

डॉ. विजय भटकर

कुलपती - नालंदा विद्यापीठ

मुख्य आश्रयदाता

रवींद्र कुलकर्णी.jpg

डॉ. रवींद्र कुलकर्णी

संस्थापक - आर्सी फाऊंडेशन

समन्वय

%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%81%E0%

श्री. चारुदत्तबुवा आफळे

राष्ट्रीय कीर्तनकार

संकल्पना

कीर्तन ही सामूहिक समाजमनावर नैतिक संस्कार करणारी आणि सामाजिक स्वास्थ्य संतुलित राखणारी एक कला आहे. ऐकणाऱ्याच्या मनात एका चैतन्याची जागृती करणारी ही शेकडो वर्षांपासूनची अभिजात अशी सांस्कृतिक परंपरा आहे. बौध्दिक, भावनिक, मानसिक, सांस्कृतिक, सांगीतिक, साहित्यिक आणि कलात्मक अशा मानवी मनाच्या विविध जाणिवांना समृद्ध करणारी कीर्तन कला अतिशय आनंद देणारी आहे. आत्मविश्वास जागवणारी, निराशा, एकटेपणा दूर पळवणारी, आदर्श जीवनपध्दतीचे वस्तुपाठ आपल्या समोर ठेवणारी कीर्तन कला आता आधुनिक स्वरूपात कीर्तन विश्व या युट्युब चॅनेलच्या माध्यमातून आपल्यासमोर येत आहे.

कीर्तन प्रवचन ही महाराष्ट्रातील आणि देशातील एक अतिशय समृद्ध परंपरा आहे. भारतीय सांस्कृतिक, धार्मिक आणि आध्यात्मिक जीवन समृद्ध होण्यासाठी कीर्तन परंपरेने फार मोठा हातभार लावलेला आहे. सामाजिक शिक्षण, नीतीमूल्यांचा आणि सहिष्णूतेचा प्रचार तसेच सामाजिक ऐक्य यासाठी कीर्तनकलेचे योगदान फार महत्त्वपूर्ण आहे. गेली शेकडो वर्षे अनेक पिढ्यांचे सांस्कृतिक, भावनिक आणि मानसिक पोषण करण्याचे काम हजारो कीर्तनकारांनी केलेले आहे आणि आजही करीत आहेत. मात्र गेल्या काही वर्षात विशेषत: इंटरनेट आणि मोबाईल यांच्या प्रसारानंतर कीर्तने, प्रवचने आणि तरूण पिढी यांची नाळ तुटल्यासारखे जाणवते. सध्याची गतिमान जीवनशैली  आणि वेळेची कमतरता तसेच शहरीकरणामुळे कीर्तनाला जाणे आणि त्याचा आनंद घेणे अवघड बनले आहे. प्रत्येक मराठी, अर्थात भारतीयांना त्याचबरोबर आता परदेशी नागरिकांनाहीकीर्तन ऐकण्याची आणि त्याचा आनंद घेण्याची मनस्वी इच्छा आहे. KirtanVishwa YouTube Channel मुळे आता प्रत्येकाला हवे तेव्हा, हवे त्या ठिकाणी हवे ते कीर्तन ऐकतायेईल, पाहता येईल आणि त्याचा आनंद घेता येईल. त्यासाठी त्याला कोणताही खर्च येणार नाही. त्याची कीर्तनाविषयी आवड वाढेल. त्यात रूची निर्माण होईल.  त्यामुळे तो भविष्यात प्रत्यक्ष कीर्तनाला येईल आणि त्याचा आनंद घेवू शकेल. एकंदरीत कीर्तन कला आणि परंपरा यांच्या प्रचाराला आणि प्रसाराला लक्षणीय मदत करेल.

 

कीर्तन हे देव, देश आणि धर्म यांचा प्रचार प्रसार करण्याचे, युवापिढीवर संस्कार करण्याचे अतिशय उत्तम माध्यम आहे. कीर्तन ही मनोरंजनाबरोबरच संगीत, नृत्य, साहित्य, कला, इतिहास, संस्कृती परंपरा  यांचीही ओळख आपल्याला करून देतात. मानवी जीवनाला वळण लावण्याचे एक विलक्षण सामर्थ्य कीर्तनकलेमध्ये आहे. त्याची ओळख आजच्या तरूण पिढीला आणि देशातील तसेच परदेशातील सर्वांना व्हावी यासाठी “कीर्तनविश्व” ही संकल्पना तयार केली आहे. याचबरोबर कीर्तन शास्त्राचा आणि कलेचा इतिहास, त्यांचे प्रकार, त्यांची आख्याने, त्यात महनीय कार्य केलेल्या व्यक्ती यांची माहिती, फोटो, इतिहास, ऑनलाईन उपलब्ध करणे, अशी ही संकल्पना आहे. विशेषत: तरूण पिढीमध्ये कीर्तनाविषयी आवड आणि जाण रूजविता येईल यासाठी विविध प्रकारच्या कीर्तनांचे व्हिडिओ प्रदर्शित करण्यात येतील. यामध्ये नारदीय कीर्तन, वारकरी कीर्तन, रामदासी कीर्तन, राष्ट्रीय कीर्तन, तुकडोजी महाराज संप्रदाय कीर्तन, दासगणू महाराज संप्रदाय कीर्तन, हरिकथा कीर्तन, वैज्ञानिक किर्तन, अन्य संप्रदाय कीर्तन प्रकारांचे सादरीकरण करण्यात येईल. 

 

कधीपासून : गुढीपाडवा १३ एप्रिल २०२१ पासून कीर्तनविश्व या युट्युब चॅनेलची सुरुवात झाली आहे. प्रत्येक आठवड्याला मंगळवार, गुरुवार आणि रविवार रोजी एक अशी एकून तीन कीर्तने प्रदर्शित होतील. प्रत्येक कीर्तन सुमारे ६० मिनिटांचे असेल. हा प्रकल्प असा पुढे १२ वर्षे चालणार आहे. गुढीपाडवा २०२१ ते गुढीपाडवा २०३४ अशी दर आठवड्याला तीन कीर्तने प्रदर्शित केली जाणार आहेत. 

 

विनम्र आवाहन : कीर्तनकला देश विदेशातील मराठी बांधवांपर्यंत पोहोचावी तसेच युवा पिढीने याचा आनंद घ्यावा म्हणून आम्ही प्रयत्नशील आहोत. कृपया याविषयीची माहिती अधिकाधिक ग्रुप्स आणि सोशल मीडियावर शेअर करा ही विनंती.

नारदीय कीर्तन

दासगणू महाराज कीर्तन

वारकरी कीर्तन

तुकडोजी महाराज कीर्तन

रामदासी कीर्तन

हरी कथा

राष्ट्रीय कीर्तन

वैज्ञानिक कीर्तनकथा

कीर्तन विश्वची माहिती अधिकाधिक व्यक्तींपर्यंत पोहोचवा.

फेसबुक + व्हॉट्सअ‍ॅप + ईमेल इ. द्वारे शेअर करा.

Share

कीर्तन विश्वचा व्हॉटसअप  ग्रुप जॉईन करा... येथे क्लिक करा

वेबसाइटला Subscribe करा

Thanks for submitting!

bottom of page