top of page

कीर्तन परंपरेला पुढे नेणारे आणि सर्वसामान्यांपर्यंत हा ठेवा पोहोचविणारे सुमन राधाकृष्ण चौधरी यांनी केलेले हे लेखन आहे. कीर्तनांमधून सामाजिक प्रबोधन होते. लोकांना नैतिकतेचे धडे मिळतात. सुमनताईनी संतांचे हे आणि असे विचार पुस्तकात मांडले आहेत. या पुस्तकात गुरुमहिमा या विषयावर पहिले संस्कृत कीर्तन आहे. अन्य कीर्तने मराठीत आहेत. नारदीय कीर्तनपरंपरेला धरून हे पुस्तक त्यांनी लिहिले आहे. त्यामुळे यात पूर्वरंग आणि उत्तररंग असे दोन भाग आहेत.

त्यांनी पूर्वरंगात निरूपणासाठी तुकाराम, रामदास, स्वरूपानंद या संतांचे अभंग निवडले आहेत. उत्तररंगात उपनिषदे, पुराण, महाभारत, रामायण व भागवत यामधील आख्याने आहेत. आख्यानात नेमके संवाद आले आहेत. केकावली, श्रीहरिपाठ, ज्ञानेश्वरी, गीता, सकलसंतगाथा, पंडित काव्य, संतकाव्य यांचा सुमनताईनी केलेला अभ्यास या पुस्तकातून दिसतो.

Kirtan Sumananjali (2)

₹275.00 Regular Price
₹219.00Sale Price
    bottom of page